Recent Posts


View My Stats

Sunday, July 5, 2009

नोकरीच्या हजारो संधी

कांदळा पोर्ट ट्रस्टमध्ये ५९ जागा
कांदळा पोर्ट ट्रस्टमध्ये पायलट (४ जागा), मरिन इंजिनिअर (३ जागा), सहाय्यक अभियंता (२ जागा), कनिष्ठ अभियंता (९ जागा), चालक-मरिन एअरक्राफ्ट (४ जागा), नर्स (२ जागा), हेल्थ व्हिजिटर/मिडवाईफ (१ जागा), सर्व्हेइंग रेकॉर्डर (१ जागा), फायरमन (७ जागा), मरिन खलाशी (२६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ३१ ऑगस्ट २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.kandlaport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. इंडियन एक्स्प्रेसमध्ये दि. ३ जुलै २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

अहमदनगर जिल्हा परिषदेत ४४ जागा
अहमदनगर जिल्हा परिषदेत परिचर (४२ जागा), कनिष्ठ लेखाधिकारी (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ७ जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात www.nagarzp.gov.in आणि http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रात ६ जागा
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे येथे सिनिअर रिसर्च फेलो (३ जागा), स्किल्ड असिस्टंट (१ जागा), फार्म असिस्टंट (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदाच्या थेट मुलाखती १४ जुलै २००९ रोजी होणार आहेत. अधिक माहिती http://nrgraps.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीत दि. २ जुलै २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ठाणे महानगरपालिकेत ६८ जागा
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात हाऊसमन (२६ जागा), रजिस्ट्रार (४२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १० जुलै २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत ३ जून २००९ आहे.

महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळात १० जागा
महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळात उपमहाव्यवस्थापक-अर्थ व लेखा (१ जागा), उपमहाव्यवस्थापक-नोगा (१ जागा), विभागीय व्यवस्थापक (४ जागा), व्यवस्थापक -लेखा (१ जागा), व्यवस्थापक- विपणन (२ जागा), व्यवस्थापक -कृषी अभियांत्रिकी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ९ जुलै २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची माहिती www. http://www.maharashtra.gov.in आणि www.maidcmumbai.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

आयुर्वेद संचालनालयात अपंगांसाठी ५ जागा
आयुर्वेद संचालनालयात अपंगांसाठी विशेष भरती मोहिमेअंतर्गत वरिष्ठ लिपिक (२ जागा) लिपिक टंकलेखक (२ जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २३ जुलै २००९ पर्यंत पोचावेत. यासंबंधीची सविस्तर माहिती व जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या http://www.maharashtra.gov.in व http://www.ayurvedinstitute.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सैन्य दलात धर्मगुरू पदांची भरती
सैन्य दलाच्या मुख्यालय, विभागीय भरती कार्यालय, पुणे यांच्यातर्फे सैन्यदलातील धर्म गुरू या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ११ जुलै २००९पर्यंत पाठवावेत. अधिक माहितीसाठी (०२०) २६३६०३४९ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

रायगड जिल्हा परिषदेत ९ जागा
रायगड जिल्हा परिषदेत राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत टेलिमेडिसीन फॉसिलिटी मॅनेजर (१ जागा), कार्यक्रम सहाय्यक (३ जागा), वैद्यकीय अधिकारी (३ जागा), मिश्रक (१ जागा), पहारेकरी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदाच्या थेट मुलाखती १० जुलै २००९ रोजी होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीत दि. २ जुलै २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक व विक्रीकर निरीक्षकांच्या ३०० जागा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहाय्यक (११० जागा), विक्रीकर निरीक्षक (१९० जागा) या पदांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज २९ जुलै २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत १ जुलै २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत ४१ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी-बालरोगतज्ज्ञ (११ जागा), वैद्यकीय अधिकारी -स्त्री रोगतज्ज्ञ (१५ जागा) प्रशिक्षित हकिम (१ जागा), क्ष किरण तज्ज्ञ (११ जागा), हृदय आलेख तज्ज्ञ (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांची भरती ९ जुलै तै १३ जुलै या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दि. १ जुलै २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत २ जागा
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटीत समाज विकास अधिकारी (१ जागा), प्रकल्प माहिती नोंदणी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांच्या थेट मुलाखती दि. ७ जुलै २००७ रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामना व सकाळच्या मुंबई आवृत्तीत दि. १ जुलै २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

टाटा मेमोरियल सेंटरमध्ये लिपिकाच्या ३० जागा
टाटा मेमोरियल सेंटरमध्ये कनिष्ठस्तर लिपिक (३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज ३१ जुलै २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीत १ जुलै २००९ या दिवशी प्रसिद्ध झाली आहे.

धारवाडच्या कृषि विज्ञान विद्यापीठात २६ जागा
कृषि विज्ञान विद्यापीठ, धारवाड (कर्नाटक) येथे प्रोफेसर (७ जागा), असोसिएट प्रोफेसर (१० जागा), असिस्टंट प्रोफेसर (४ जागा), सहायक वैद्यकीय अधिकारी (१ जागा), कनिष्ठ अभियंता (१ जागा), फार्मासिस्ट (१ जागा), इलेक्ट्रिकल वायरमन (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २७ जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. यासंबंधीची अधिक माहिती www.uasd.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीत दि. १ जुलै २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

इस्टर्न कोलफिल्डमध्ये २२४ जागा
इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये मायनिंग सिरदर (२०७ जागा), डेप्युटी सर्व्हेअर (१७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १० जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ जून - ३ जुलै या अंकात आली आहे.

सेंट्रल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ८ जागा
सेंट्रल मरिन फिशरिज रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये स्पेशालिस्ट (एकूण ५ जागा), प्रोग्राम असिस्टंट (२ जागा), स्टेनोग्राफर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १५ जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ जून - ३ जुलै या अंकात आली आहे.

साऊथ इस्टर्न कोलफिल्डमध्ये ५७ जागा
साऊथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडमध्ये स्टाफ नर्स (४१ जागा), ट्रेनी रेडिओग्राफर (७ जागा), ट्रेनी लॅब टेक्निशियन (६ जागा), ट्रेनी फिजिओथेरपिस्ट (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २० जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती http://www.secl.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये १८ जागा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये उप कुलसचिव- वित्त (१ जागा), ग्रंथालय अधिकारी (१ जागा), व्यवस्थापक-हॉस्टेल सेवा (१ जागा), व्यवस्थापक- उपहारगृह (१ जागा), ग्रंथालय सहाय्यक (३ जागा), तांत्रिक सहाय्यक (४ जागा), स्वीय सहाय्यक (३ जागा), ट्रेडसमन (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १० जुलै २००९ पर्यंत पाठवावेत. अर्ज www.iist.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ जून - ३ जुलै या अंकात आली आहे.

पुणे महसूल विभागात ६ जागा
महसूल व वनविभागाच्या पुणे कार्यालयात लिपिक टंकलेखक (४ जागा), तलाठी (१ जागा), शिपाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १० जुलै २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात दै. प्रभात व सांजमहानगरीच्या पुणे आवृत्तीत दि. २५ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, (महसूल शाखा), पुणे येथे संपर्क साधावा.

कॅबिनेट सेक्रेटरीएटमध्ये २२ जागा
केंद्र शासनाच्या कॅबिनेट सेक्रेटरीएटमध्ये पर्सनल असिस्टंट (११ जागा), स्टेनोग्राफर (११ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २७ जून - ३ जुलै या अंकात आली आहे.

मध्य प्रदेश उच्च न्यायालयात २७ जागा
मध्य प्रदेश उच्च न्यायालयात सिव्हिल जज्ज (२७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज ३१ जुलै २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mpinfo.org/mpinfonew/rojgar/२००९/२९०६/mphighcourth_jabalpur.pdf या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेत २४ जागा
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेत कनिष्ठ अभियंता (१४ जागा), कनिष्ठ रसायनी (१ जागा), कनिष्ठ भूभौतिक तज्ञ (३ जागा), तांत्रिक अधिकारी (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत २८ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

यूपीएससीतर्फे ३० जागांची भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयातील ट्रेड अँड जिओग्राफिकल इंडिकेशन (१६ जागा), संरक्षण मंत्रालयातील कनिष्ठ तांत्रिक अधिकारी (२ जागा), वरिष्ठ शास्त्रीय अधिकारी (३ जागा), गृह मंत्रालयातील वरिष्ठ शास्त्रीय अधिकारी (४ जागा), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील विशेषज्ञ (२ जागा), दिल्ली प्रशासनातील विभागीय अधिकारी (१ जागा), चंदीगढ प्रशासनातील प्रोफेर (१ जागा), सिनिअर लेक्चरर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १६ जुलै २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात दै. नवाकाळच्या मुंबई आवृत्तीत दि. २७ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय स्टेट बँकेत ४८१ जागा
भारतीय स्टेट बँकेत अधिकारी-मार्केटिंग आणि रिकव्हरी (ग्रामीण) (४५० जागा, महाराष्ट्रातील ६५ जागांसह), तांत्रिक अधिकारी (३१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २५ जुलै २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची अधिक माहिती http://sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत १०१ जागा
नाशिक जिल्हा परिषदेत जिल्हा निवड समिती मार्फत कृषि अधिकारी (३ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१ जागा), विस्तार अधिकारी-शिक्षण (३ जागा), औषध निर्माता (४ जागा), आरोग्य सेविका-महिला (१० जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (३६ जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (२ जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (१५ जागा), परिचर (२७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी व प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठीचे अर्ज ३० जूनपर्यंत, औषध निर्माता, आरोग्य सेविका व स्थापत्य अभियांत्रिकी पदासाठीचे अर्ज ४ जुलैपर्यंत व वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक व परिचर या पदांसाठीचे अर्ज ८ जुलै पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीत २६ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेत १३ जागा
नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्रासाठी विशेष शिक्षक-मतिमंद शाळेकरिता (५ जागा), विशेष शिक्षक-अध्ययन अक्षमता शाळेकरिता (६ जागा), संगणक शिक्षक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १० जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत २६ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत ४ जागा
टाटा मूलभूत संशोधन संस्थेत सायंटिफिक असिस्टंट (१ जागा), लॅबोरेटरी असिस्टंट (१ जागा), कारकून (१ जागा), अटेंडंट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांत करावे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्सच्या २५ जून २००९ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

भारतीय नौदलामध्ये भरती
भारतीय नौदलात लॉजिस्टिक केडर व लॉ केडरमध्ये भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २००९ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीत दि. २५ जुलै २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे. तसेच http://www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळावरही माहिती उपलब्ध आहे.

भारतीय नौसेनेत विविध पदांची भरती
भारतीय नौसेनेत स्ट्यूअर्ड, कुक व टोपास या पदांची भरती करण्यात येणार आहे. अर्ज ६ जुलै २००९ पर्यंत पोचवेत. यासंबंधीची अधिक माहिती http://www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

'सीएसआयआर'मध्ये १३३ जागा
कौन्सिल ऑफ सायन्स अँड इंडस्ट्रियल रिसर्चमध्ये संयुक्त प्रशासकीय सेवा परीक्षे अंर्तगत कक्ष अधिकारी (४३ जागा), एक्झिक्युटिव्ह असिस्टंट (९० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १५ जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती www.csir.res.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२५ जून २००९ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

अणु ऊर्जा विभागात मागासवर्गीयांसाठी १६ जागा
केंद्र शासनाच्या अणुऊर्जा विभागात मागासवर्गीयांच्या विशेष भरती मोहिमेअंतर्गत स्टायपंडरी ट्रेनी (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज तीन आठवड्याच्या आत पाठवावेत. अधिक माहिती www.nfc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२५ जून २००९ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

स्टाफ सिलेक्शन मार्फत ११ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत बोटॉनिकल असिस्टंट (२ जागा), प्रिझर्व्हेशन असिस्टंट (१ जागा), माहिती सहायक (२ जागा), कनिष्ठ हिंदी भाषांतरकार (१ जागा), असिस्टंट सेंट्रल इंटिलिजन्स ऑफिसर (१ जागा), ग्रंथालय आणि माहिती सहायक (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २० जुलै २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२५ जून २००९ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

दिल्ली रेल्वे कार्पोरेशनमध्ये ६८४ जागा
दिल्ली रेल्वे कार्पेरेशन लिमिटेडमध्ये ज्युनिअर एक्झिक्युटिव्ह -लिगल (२ जागा), वरिष्ठ सिस्टिम अनॉलिस्ट (९ जागा), स्टेशन कंट्रोलर/ट्रेन ऑपरेटर (४२१ जागा), कनिष्ठ अभियंता (२५२ जागा), कार्यालय सहायक (६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १७ जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती www.delhimetrorail.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२५ जून २००९ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

न्यूक्लिअर कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये मागासवर्गीयांसाठी २७ जागा
न्यूक्लिअर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये मागासवर्गीयांच्या विशेष भरतीमोहिमेअंतर्गत साठी स्टायपेंडरी ट्रेनी-पदविकाधारक (९ जागा), स्टायपेंडरी ट्रेनी- शास्त्र पदवीधर (१ जागा), स्टायपेंडरी ट्रेनी- ऑपरेटर (५ जागा), स्टायपेंडरी ट्रेनी-मेंटेनर (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २० जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती www.npcil.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२५ जून २००९ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

पंचशील ग्रामीण बँकेत ९८ जागा
पंचशील ग्रामीण बँकेत अधिकारी (२३ जागा), कार्यालय सहायक (७५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ८ जुलै २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २०-२५ जून २००९ च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत २३८२ जागा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत सामाजिक सुरक्षा सहाय्यक (२३८२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्रातील ६३० जागांचा समावेश आहे. अर्ज ८ जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती www.epfindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीत दि. २१ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भूजल सर्वेक्षण विभागात ६ जागा
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या कोकण विभागात भौमाप्र व. सहाय्यक (१ जागा), भौमाप्र -सहाय्यक (१ जागा), सर्वेक्षक (२ जागा), लिपिक टंकलेखक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसात पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत दि. २१ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे. तसेच अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत ४ जागा
कोल्हापूर महानगर पालिकेत वैद्यकीय अधिकारी (१ जागा), आरोग्य निरीक्षक (१ जागा), अधिक्षक (१ जागा), वरिष्ठ लिपिक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ७ जुलै २००९ पूर्वी पोचतील असे पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात दै. पुढारीच्या कोल्हापूर आवृत्तीत ९ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.indiaseeds.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये ३४ जागा
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये सायंटिफिक ऑफिसर (३ जागा), प्रशासकिय अधिकारी (१ जागा), सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटर (१ जागा), सिस्टिम मॅनेजर (१ जागा), सेक्शन ऑफिसर (६ जागा), सायंटिफिक असिस्टंट (१ जागा), कार्यालयीन सहायक (१५ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (६ जागा), ट्रेडसमन (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ३१ जुलै २००९ पूर्वी करावे. अधिक माहिती www.niser.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात टाइम्स ऑफ इंडियामध्ये १७ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

राज्य विमा महामंडळात ३ जागा
कामगार राज्य विमा महामंडळ, महाराष्ट्र विभागात कनिष्ठ स्तर लिपिक (२ जागा), शिपाई (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १५ जुलै २००९ पूर्वी करावेत. अधिक माहिती www.esicpune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्स व टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीत दि. २० जुलै २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

यूपीएससीच्या भू वैज्ञानिक परीक्षेची घोषणा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या भू वैज्ञानिक परीक्षा २००९ची घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख २० जुलै २००९ आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता, टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीत दि. २० जुलै २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्समध्ये ९३ जागा
गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक (१ जागा), अतिरिक्त महाव्यवस्थापक (४ जागा), उपमहाव्यवस्थापक (१० जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (१ जागा), व्यवस्थापक (१३ जागा), उपव्यवस्थापक (३ जागा), सहायक व्यवस्थापक (४८ जागा), कनिष्ठ व्यवस्थापक (१३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २००९ आहे. यासंबंधी अधिक माहिती www.grse.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३-१९ जून २००९ च्या अंकात आली आहे.

नॅशनल सिड कार्पोरेशनमध्ये कनिष्ठ सहायकाच्या १५ जागा
नॅशनल सिड कार्पोरेशनमध्ये कनिष्ठ सहायक (१५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज २० जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती http://www.indiaseeds.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मध्य रेल्वेत शिक्षक पदाच्या ५ जागा
मध्य रेल्वेच्या कल्याण येथील शाळेत करार तत्त्वावर शिक्षक (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदाच्या थेट मुलाखती १० जुलै २००९ रोजी होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ, लोकमत, टाइम्स ऑफ इंडिया, सामना या वृत्तपत्रात दि. १७ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

नॅशनल सिड कार्पोरेशनमध्ये १९ जागा
नॅशनल सिड कार्पोरेशनमध्ये उपमहाव्यवस्थापक (१ जागा), कार्यकारी अभियंता (१ जागा), व्यवस्थापक (१ जागा), सहायक व्यवस्थापक (१ जागा), असिस्टंट अकाऊंटस् (८ जागा), कार्यालयीन सहायक (२ जागा), सहायक व्यवस्थापक -उत्पादन (३ जागा), प्रोग्रामर (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १४ जुलै पूर्वी पाठवावेत. अधिक माहिती http://www.indiaseeds.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्टाफ सिलेक्शन मार्फत २ जागांची भरती
स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत असिस्टंट सेंट्रल इंटिलिजंट ऑफिसर (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ जुलै २००९ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३-१९ जून २००९ च्या अंकात आली आहे.

लष्करात वाहनचालकाच्या २ जागा
लष्कराच्या ५१२१ एएससी बटालियनमध्ये सिव्हिलीयन मोटार ड्रायव्हर (२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज १२ जुलै २००९ पूर्वी पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३-१९ जून २००९ च्या अंकात आली आहे.

मुंबईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये ३ जागा
मुंबई येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या संस्थेत वैद्यकीय अधिकारी (१ जागा), सहायक कुलसचिव (१ जागा),अधिक्षक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज तीन आठवड्याच्या आत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३-१९ जून २००९ च्या अंकात आली आहे.

गोव्यातील महाराष्ट्र परिचय केंद्रात ग्रंथपालाची १ जागा
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या गोवा येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात ग्रंथपाल (१ जागा खुला) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज १४ जुलै २००९ पर्यंत वरिष्ठ सहायक संचालक, महाराष्ट्र परिचय केंद्र, महाराष्ट्र शासन, डॉ. दादा वैद्य मार्ग, पणजी, गोवा - ४०३००१ या पत्त्यावर पाठवावेत. अधिक माहिती http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारत संचार निगमच्या बिहारमध्ये १७१ जागा
भारत संचार निगम लिमिटेडच्या बिहार सर्कलमध्ये टेलिकॉम टेक्निकल असिस्टंट (१७१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २००९ आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३-१९ जून २००९ च्या अंकात आली आहे.

नॅशनल डेरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये ५ जागा
नॅशनल डेरी रिसर्च इन्स्टिट्यूट, कर्नाळ (हरियाणा) येथे तांत्रिक पदाच्या एकूण ५ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज ३० दिवसाच्या आत करावेत. अधिक माहिती www.ndri.res.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १३-१९ जून २००९ च्या अंकात आली आहे.

सिडकोमध्ये ६९ जागा
शहर व औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र (सिडको) मध्ये कार्यकारी अभियंता (१ जागा), विकास अधिकारी (४ जागा), लेखा अधिकारी (२ जागा), सहाय्यक जनसंपर्क अधिकारी (१ जागा), सहाय्यक अभियंता - स्थापत्य (५९ जागा), क्षेत्राधिकारी-वास्तुशास्त्र (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २००९ आहे. अधिक माहिती व अर्जाचा नमुना www.cidcoindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीत दि. १५ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

सोलापूर विद्यापीठात कुलसचिव पदाची भरती
सोलापूर विद्यापीठात कुलसचिव (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २००९ आहे. अधिक माहिती http://su.digitaluniversity.ac. व http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात महिलांसाठी ४२ जागा
इंडो तिबेटियन सीमा पोलीस दलात महिलांसाठी हेड कॉन्स्टेबल (मिडवाइफ) पदाच्या एकूण ४२ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २००९ आहे. अधिक माहिती www.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीत दि. १३ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

युनियन बँकेत ८९० जागा
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक (५० जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (१०० जागा), व्यवस्थापक (१९० जागा), सहायक व्यवस्थापक (५५० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २००९ आहे. यासंबंधी अधिक माहिती http://www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे विद्यापीठात २६ जागा
पुणे विद्यापीठात शिक्षक संवर्गातील एकूण २४ जागा आणि समन्वयक (१ जागा), प्लेसमेंट अँड कार्पोरेट रिलेशन ऑफिसर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २००९ आहे. अधिक माहिती www.unipune.ernet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीत १३ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ४१ जागा
मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे ऍप्रेटिंससाठी फिटर (८ जागा), टर्नर (३ जागा), इलेक्ट्रिशियन (६ जागा), मेकॅनिक (१२ जागा), वेल्डर (४ जागा), प्रोग्रामिंग अँड सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेट असिस्टंट (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २००९ आहे. अधिक माहिती www.mumbaiport.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. १० जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कोल्हापूर महानगरपालिकेत ४ जागा
कोल्हापूर महानगरपालिकेत अपंग प्रवर्गात वैद्यकीय अधिकारी (१ जागा), अधिक्षक (१ जागा), वरिष्ठ लिपिक (१ जागा), आरोग्य निरीक्षक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २००९ आहे. अधिक माहिती www.kolhapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात अपंगांसाठी २२ जागा
संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई येथे अपंग कोट्याअंतर्गत अधिपरिचारिका (२२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतच्या मुंबई आवृत्तीत ९ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

चेन्नई पोर्ट ट्रस्टमध्ये मागासवर्गीयांसाठी २ जागा
चेन्नई पोर्ट ट्रस्टमध्ये मागासवर्गीयांसाठी मरिन इंजिनिअर (१ जागा), डेप्युटी मरिन इंजिनिअर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २००९ आहे. यासंबंधीची जाहीरात दै. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीत ८ जून २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ऑइल इंडियामध्ये अधिकारी पदाच्या जागा
ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये एक्झिक्युटिव्ह ट्रेनी, वैद्यकीय अधिकारी व रक्तपेढी अधिकारी या पदांची भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ जुलै २००९ आहे. यासंबंधी अधिक www.oil-india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय अर्थ सेवा/सांख्यिकी सेवा परीक्षेची घोषणा
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणार्‍या भारतीय अर्थ सेवा / सांख्यिकी सेवा २००९ या परीक्षेची घोषणा झाली आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २००९ आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच दै. लोकसत्ता, नवाकाळ, महाराष्ट्र टाइम्स या दैनिकांत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.

भारतीय नौदलात सेलर भरती
भारतीय नौदलात सेलर-एअरक्राफ्ट ऍप्रेंटिस या पदाची भरती करण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २००९ आहे. अधिक माहिती www.nausena-bharti.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियाच्या ६ जून २००९ च्या मुंबई आवृत्तीत आली आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनमध्ये २३९३ जागा
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनमध्ये कनिष्ठ अभियंता (११ जागा), सामाजिक सुरक्षा सहायक (२३८२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. यापदांच्या परीक्षेचे महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे, औरंगाबाद येथे केंद्रे आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जुलै २००९ आहे. यासंबंधीची जाहिरात ३१ मे २००९ च्या दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत आली आहे.

बायोटेक्नॉलॉजी विभागात संचालक पदाची एक जागा
सायन्स अँड टेक्नॉलॉजी मंत्रालयाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाच्या नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटरचे संचालक (१ जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ जुलै २००९ आहे. यासंबंधीची जाहिरात टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीत ८ मे २००९ रोजी आली आहे.

0 comments:

Twitter Delicious Facebook Digg Stumbleupon Favorites More